आत्ता खिडक्याही स्मार्टच वापरु….

Infinitysmartfilm. Com
Image credit: Infinitysmartfilm.com

स्मार्ट खिडकी: एक विद्युतरंगी खिडकी

आपल्या इमारतीच्या खिडक्यांसाठी आपण साध्या काचेचा वापर करतो. साध्या काचेचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. साध्या काचेमुळे प्रकाश व उष्णता दोन्हीही आतमध्ये येऊ शकतात याऐवजी आपण स्मार्ट खिडकीचा वापर करु शकतो. या काचेला विद्युतरंगी खिडकी (Electrochromic window) असे म्हणतात. ही काच सौर उष्णता नियंत्रित करते व आपोआप रंग बदलते. यामध्ये विद्युतरंगी पदार्थ वापरले जातात आणि या काचेला विद्युतप्रवाह पुरवले असता ती काच रंग बदलते तसेच या काचेपासून आपण स्मार्ट खिडकी बनवू शकतो. सामान्यतः स्मार्ट खिडकी वेगवेगळ्या रंगाच्या असतात आणि जेव्हा आपण विद्युतप्रवाह देतो तेव्हा ते पारदर्शक होतात. विद्युतरंगी काचेचे वेगवेगळे प्रकार असतात काही काचा सूर्यकिरणांमुळे गडद होतात, काही अपारदर्शक होतात तर काही आरशासारख्या वर्तन करतात ज्यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होतात. वेगवेगळ्या काचेचे प्रकार हे विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाने तयार केले जातात.

स्मार्ट खिडकीचे फायदे:

स्मार्ट खिडक्या गडद स्थितीमध्ये सर्व सूर्यकिरणे (९८%) परावर्तित करतात आणि यामुळे ACची गरज भासत नाही. AC आणि स्मार्ट काच यांची तुलना केली असता स्मार्टकाचेला कार्य करण्यासाठी फक्त ACच्या २०% विद्युत ऊर्जा लागते. ऊर्जेच्या राष्ट्रीय नूतनीकरण ऊर्जाप्रयोगशाळेच्या (एन आर ई एल) हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांच्या मते, यासारख्या इमारतीच्या खिडक्या एकूण ऊर्जेच्या वापराच्या ८ टक्के ऊर्जा वाचवू शकतात; कारण गडद रंगापासून पारदर्शी होण्यासाठी आणि खिडकी चालू करण्यासाठी फक्त थोडीशी ऊर्जेची गरज असते. १०० खिडक्या एका दिव्याइतकी ऊर्जा वापरतात त्यामुळे, स्मार्ट खिडकी हि फायद्याची गोष्ट आहे. पण स्मार्ट खिडकीच्या जगभर उत्पादनासाठी खूप सारा खर्च करावा लागतो, सामान्य काचेपेक्षा स्मार्ट काच महाग असते कारण इलेक्ट्रोड, छापलेले ग्लास आणि मेटल कोटींग्जची किंमत जास्त असते. हा खर्च कमी करण्यासाठीही संशोधन सुरु आहे. कारण या स्मार्ट काचेचे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. स्मार्ट खिडकीच्या कार्यक्षमतेबद्दलही अनेक प्रश्न आहेत, त्यातील सामग्री किती टिकाऊ आहे यावर तिची कार्यक्षमता ठरते. सध्याच्या स्मार्ट खिडक्या केवळ १०-२० वर्षे चालतात. जे बहुतांश घरमालकांच्या अपेक्षेपेक्षा खूप लहान आयुष्य आहे. वर्तमान स्मार्ट खिडकीची आणखी एक त्रुटी म्हणजे त्या स्पष्ट आणि अपारदर्शी होण्यासाठी वेळ घेतात, त्यासाठी काही मिनिटेही लागू शकतात, तरी स्टिक-ऑन इलेक्ट्रोक्रोमिक फिल्म अधिक वेगवान आहेत, अपारदर्शी होण्यासाठी एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो.

सौर सेल-विद्दुतरंगी खिडकी : एक भविष्यवेध

भविष्यात स्मार्ट खिडक्या कश्या सुधारतील याकडे लक्ष द्यायला हवे. विद्युतरंगी खिडक्या आणि सौर सेल यांचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न चालूआहे. जेणेकरून, अनावश्यक सूर्यप्रकाश म्हणजेच ज्यामुळे आपल्या घरातील तापमान वाढते त्याच सूर्यप्रकाशाचा उपयोग करून स्मार्ट खिडकी कार्य करू शकतील आणि नंतर ते ती ऊर्जाही संचियत करू शकतील. आपण त्या ऊर्जेचा दुसऱ्या कार्यासाठीही वापर करू शकतो. अशी कल्पना करा की, दिवसा काही सौरऊर्जा खिडक्यांवरवर पडते आणि रात्रीच्या वेळी आपल्या घरात बरीच रोशनाई करू शकते. संपूर्ण जगाला ग्लोबल वार्मिंग आणि ऊर्जासंकटाची समस्या आहे. सौर सेल-विद्दुतरंगी खिडकी हा चांगला पर्याय आहे परंतु यासाठी संशोधनाची गरज आहे. सौर सेल-विद्दुतरंगी खिडकी वापरकर्त्यास अभूतपूर्व लाभ देऊ शकेल आणि त्याच वेळी प्रचंड ऊर्जा बचतदेखील होऊ शकेल. इमारतीच्या बांधकामासाठी या खिडकीचा वापर करण्याचा एक फायदा म्हणजे या खिडक्या प्रकाशाची मात्रा नियंत्रित करतीलच पण ते सूर्यप्रकाश वापरून विद्युत ऊर्जाही निर्माण करतील. यामुळे ACचा वापर कमी होईल आणि ग्लोबल वार्मिंग कमी करण्यास मदत होईल. भविष्यात विद्युतरंगी तंत्रज्ञान अधिक प्रभावी होईल आणि सामान्य लोक अश्या स्मार्ट खिडक्या वापरू शकतील अशी अपेक्षा आहे.

जागतिक तापमान वाढ आणि ऊर्जा संकट:

गेल्या शंभर वर्षांत खूप तापमानवाढ झाली आहे, हि तापमानवाढ मुखत्वे हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्येच तापमानवाढीला कारणीभूत असणाऱ्या काही गोष्टी आहेत. शीतकररणासाठी फ्रीजमध्येजे कृत्रिम वायू वापरले जातात तसेच ACमध्ये ज्या रेफ्रिजंट्सचा वापर करतात हे प्रामुख्यानं हरितगृह वायू आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असणारे रेफ्रिजंट हाइड्रोफ्लोरोकार्बन (एच एफ सी) आणि हाइड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन (एच सी एफ सी) हे आहेत. यातील कोणत्याही वायूची गळती थेट वातावरणात मिसळली जाते जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणजे जागितक तापमान वाढीमध्ये वातानुकूलन व्यवस्था (AC) हे सुद्धा एक कारण आहे. जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा कारमध्ये वातानुकूलन व्यवस्था बसवलेली असते, वातावरणास हानीकारक असलेल्या अश्या प्रत्येक ACच्या तीव्रतेची कल्पना करणे कठीण आहे. ACच्या वापरामुळे इतर समस्याही दिसून येत आहेत पण त्याकडे लोक अजूनतरी दुर्लक्ष करत आहेत, ACच्या वापरामुळे विलक्षण प्रमाणात कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडले जात आहे. तसेच AC हे मोठ्या प्रमाणात वीज वापरणारे साधन म्हणून ओळखले जाते कारण ते कार्य
करण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. सध्या संपूर्ण जगाला ग्लोबल वार्मिंग त्याचबरोबर ऊर्जासंकटाची
समस्या आहे. म्हणून आपल्याला या समस्यांचा उपाय शोधून काढायला हवा. प्रत्येकजण पर्यावरणाच्या नुकसानाबद्दल बोलत असतो परंतु फारच कमी लोक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पावले उचलत आहेत. या समस्येचा पूर्णपणे निरसन होणार नाही पण आपण थोडा तरी प्रयत्न करू शकतो. या सर्व कारणांमुळे AC चा वापरच सोडून देणे हा सुद्धा उपाय होणार नाही त्याऐवजी, पर्यायी व्यवस्था शोधायला हवी. सौर सेल-विद्दुतरंगी खिडकी एक उत्तम पर्याय आहे. जसे आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहेत तसेच भविष्यात सर्वांच्या इमारतीला स्मार्ट खिडक्या असतील…

The Flash into Mind

Is it possible to travel in time without time machine?

Yes.

The Flash can.

Flash” is a comic book TV series, in which Barry Allen is struck by lightning in a freak accident and now he has the ability to run at super-human speed.  We know that speed is the easiest way to travel in time and Flash can run faster than the speed of light. So, he can travel into the future as well as the past.

I have deeply enjoyed every aspect of the show and it has affected my dreams too. Once I had dream that I can travel into the past and I had conversations with my younger self. It was an unbelievable experience for me. I woke up in the morning with thoughts about the Flash. But I realized that I have to work from home since there is lockdown due to corona virus pandemic. 

I had been working for an hour and suddenly an idea flashed into my mind and I wrote it down.

“It would be amazing if someone has powers like the Flash. We could save the world from this pandemic with help of this power. If someone has this power then he could simply travel into the past and find out the first corona positive patient. The doctor would treat that patient by following social distancing. When he is cured, speedster would come back to the present and everything would be fine as before.”

“We would be in an alternate timeline“. No news of corona, no lockdown, no work from home: news channels showing their regular news and people doing their regular work.

Suddenly, I came out of my mind and again realized that I have to work from home. Because, the reality is different than this. There is no flash, no superhero and real superheroes are doctors and nurses. They are saving lives, they are doing their best.

Dreams are all about getting ideas. Sometimes, it is good to be in a self virtual world. Where, we can manage our stress. We can not be like Flash but we have a “speedy mind“. It can go to the past and think about the future.  The difference is we can’t change the past but we have ability to set the future as we want…….

  • Where do you want to go with your speedy mind?

“कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : एक संधी”

आपल्याला माहीत असेलच, अलिकडे रोबोट्स आपल्या- सारखेच निरीक्षण करू शकतात. इतकेच नव्हे तर ते माणसासारखा विचार करून स्वतःच निर्णय घेऊ शकतात. या सर्व गोष्टी कशामुळे शक्य झाल्या? तर त्या कृत्रिम बुद्धमत्तेमुळे शक्य झाल्या. आपल्याला बुद्धिमत्ता म्हणजे काय हे माहित आहे परंतु कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे काय माहित आहे का ?

कृत्रिम वस्तूने दर्शवलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence, AI) असे म्हणतात. या तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रामध्ये करतात. रोबोटमुळे तर कृत्रिम बुद्धीमत्ता हा एक अतिशय लोकप्रिय विषय बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रोबोटकडे आकर्षित होतात. फक्त रोबोट नाही तर अनेक वेगवेगळ्या  व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञानाची चर्चा केली जात आहे. इंग्रजी भाषेत या तंत्रज्ञानाची बरीचशी माहिती उपलब्ध आहे. पण, मराठी भाषेत या तंत्रज्ञानाबद्दल जास्त लिहिले गेले नाही. या तंत्रज्ञानाबद्दल ब्लॉग लिहिण्याचा उद्देश असा आहे की, मराठी वाचकांना या तंत्रज्ञानाची निदान तोंडओळख व्हावी. बरेच तज्ञ असा तर्क करतात की, AI हे भविष्य आहे , परंतु जर आपण सभोताली पाहले तर आपल्याला समजेल की हे AI भविष्य नाही तर ते वर्तमान आहे. आपल्याकडे ज्या विषयाची भरपूर माहती (data) उपलब्ध आहे त्याठिकाणी आपण या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. पूर्वीपेक्षा आजकाल माहिती साठवून ठेवणे (data storage) खूप सोपे आणि स्वस्त झाले आहे. त्यामुळे नवनवीन क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे कसा वापर करता येईल याकडे भर दिला जात आहे.

रोजच्या वापरमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे आणि ही उदाहरणे आपल्या जवळचीच आहेत. आपल्या जवळ असलेल्या मोबाइलमध्येच या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. केवळ मोबाइलच नाही तर ऑटोमोबाईल क्षेत्रही कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल करत आहे. भविष्यात वाहनचालक वाहन चालवण्याऐवजी फक्त एखाद्याच्या सूचनेवरती वाहन चालेल. टेस्ला कार हे एक त्याचे उत्तम उदाहरण आहे जी  वाहनचालकाच्या सूचनेवरती चालते. जमिनीवरच नव्हे तर अांतराळामध्येही मोठ्या वस्तू हलववण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित रोबोट्सचा वापर होतो. हवामान अांदाजामध्येही या तंत्रज्ञानाचा वापर होतो. अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, यंत्र शिक्षणाच्या (Machine learning) वापराने  ढगांच्या हालचाली वरुन चक्रीवादळाचा तर्क लावणे साध्य झाले आहे. यंत्र शिक्षण हा कृत्रिम बुद्धिमतेचाच एक भाग आहे. AI तंत्रज्ञानाचे वैद्यकीय क्षेत्रातील काम मनुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. मानवापेक्षा अधिक चांगले आणि वेगवान रोगनिदान करण्यासाठी यंत्र शिक्षणाचा वापर सुरु आहे. रोबोट्सच्या साह्याने शस्त्रक्रियाही करता येते. तसेच शेअर मार्केट आणि बॅंकांच्या व्यवहारामध्येही AI त्याची कामगिरी बजावत आहे. अशाप्रकारे वेगवेगळी कामे AI च्या साह्याने सहज करता येणे शक्य झाले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असे म्हणावे लागेल.

AI तंत्रज्ञान इतके चांगले कसे काम करते?              जसे एखाद्या विशिष्ट काम करणाऱ्या व्यक्तिला त्याच्या कामापूर्वी  प्रक्षिशण दिले जाते तसेच AI लाही प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे, माणूसच AI ला बुद्धिमान बनवतो. कारण, AI ला प्रशिक्षण देण्यासाठी कोणती माहिती वापरावी हे माणूसच ठरवतो. या तंत्रज्ञानामुळे व्यवसायातील विविध कार्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, AI ग्राहकांच्या उत्तम पध्दतीने शंकानिर्सन करु शकते. AI च्या कार्य करण्याचा क्षमतेमुळे सामान्य लोकांमध्ये अशी भीती निर्माण होऊ शकते की, AI मुळे आपली नोकरी तर जाणार नाही ना? आज माणसाची जागा यंत्राने घेतली आहे आणि यापुढेही ते घेतील पण यंत्राचे उत्पादन करण्यासाठी त्याची यंत्रणा करण्यासाठी माणसाची गरज असते. आपल्याला हे लक्षात  ठेवण्याची गरज आहे की, तंत्रज्ञान फक्त कार्य करण्याच्या पध्दती आणि सेवा सुधारेल, पण त्यांच्या वापरावरती पूर्णपणे  मानवाचेच नियंत्रण असणार आहे. म्हणूनच, आजच्या तरुण पिढीने आपल्याला कोणत्या क्षेत्रात चांगले काम करण्याची संधी मिळेल या गोष्टीचा विचार करूनच स्वतःचे क्षेत्र निवडण्याची गरज आहे आणि भविष्यात AI या तंत्रज्ञानामुळे अनेक संध्या उपलब्ध होतील.                   

या तंत्रज्ञानाविषयी आणखी जाणून घेऊ पुढील ब्लॉगमध्ये…….